रत्नागिरी : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीकडून जागावाटप आणि उमेदवारांची निश्चिती यासाठी धावपळ सुरू आहे. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून निलेश राणे यांचे नाव निश्चित आहे. माजी खासदार निलेश राणे हे भाजपाकडून नाही, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ही उमेदवारी लढवणार असल्याचे निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. आज निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेनेचे भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत २३ ऑक्टोबर रोजी प्रवेश करण्याचे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.









