Mandangad : शिगवण स्मशानभूमी टॉवरबाबत निवेदन

मंडणगड : शिगवण येथील स्मशानभूमीत उभारलेला टॉवर बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत याबाबत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद येलवे व सहकाऱ्यांनी गटविकास अधिकारी सुनील खरात यांच्याकडे नुकतीच निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनात म्हटले आहे की, शिरगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये चक्रवर्ती सम्राट अशोकनगर व आदिवाडी शिगवण यांच्या स्मशानभूमीत चुकीच्या पद्धतीने ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ठराव मंजूर करून बीएसएनएल कंपनीचा मोबाइल टॉवर उभा करण्यासाठी परवानग्या दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 30-Aug-2025