Breaking : बीजेपी विधानसभा समन्वयक पदी सचिन वहाळकर यांची नियुक्ती

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात बीजेपी चे बाळ माने बंडाच्या तयारीत असताना बीजेपी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून एक पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रानुसार बीजेपी चे कार्यकर्ते सचिन वहाळकर यांची विधानसभा महायुती भाजपा समन्वयक पदी नेमणूक करण्यात आली आहे. विधानसभा २०२४ आणि त्या अनुषंगाने असणारे वातावरण यामध्ये ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असल्याचे सांगणयात येतंय. या अंतर्गत पक्षातील आणि महायुतीतील मित्रपक्षांचा योग्य समन्वय व सुसंवाद ठेवण्याची जबाबदारी सचिन वहाळकर यांच्यावर देण्यात आली आहे. यासाठी मित्र पक्षाच्या समन्वयकाशी तत्काळ संपर्क साधून निवडणूक काळातील कामांचे नियोजन करावे असे या पत्रात सांगण्यात आले आहे. तसेच याबाबतचा अहवाल मेल करावा असे देखील सांगण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:00 AM 21/Oct/2024