महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती उपाध्यक्षपदी आमदार शेखर निकम, सदस्यपदी गोविंद राठोड

खेड : पुणे येथील महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या उपाध्यक्षपदी चिपळूणचे आमदार शेखर निकम तर राज्य कार्यकारिणीच्या सदस्यपदी रत्नागिरी जिल्हा राष्ट्रभाषा प्रचार समितीचे जिल्हा संघटक गोविंद राठोड यांची निवड झाली आहे. संचालक पदावर जयराम फगरे यांची निवड झाली.

महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या पुणे येथील कार्यालयात झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, द्वितीय उपाध्यक्ष म्हणून सदानंद महाजन, कार्याध्यक्ष म्हणून डॉ. सुनील देवधर तर कोषाध्यक्षपदी मधुमिलिंद मेहंदळे यांची निवड करण्यात आली.

डॉ. बंडोपंत पाटील, नागेश बिराजदार, नागेश बंडे (सोलापूर) प्रकाश सुतार (कोल्हापूर), संजय भारद्वाज, सत्येंद्रसिंह, संजय लेले, माधव माटे, डॉ. प्रसाद जोशी व अॅड. एन. डी. पाटील (पुणे), बन्सीलाल गाडी लोहार (नाशिक) व डॉक्टर हेमचंद वैद्य (वर्धा), आमदार शेखर निकम व गोविंद राठोड यांची राज्य कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 01-Sep-2025