Ratnagiri: पर्ससिन नेट मच्छीमारीस आजपासून प्रारंभ

रत्नागिरी : तीन महिन्यांच्या बंदी कालावधीनंतर पर्ससिन नेट मच्छीमारीला सोमवारपासून (ता. १) सुरुवात होणार आहे.

जिल्ह्यात पर्ससिन नेटचा परवाना असलेले मोजकेच मच्छीमार आहेत. शासनाच्या आदेशानुसार त्यांनाही १२ नॉटिकल मैलाबाहेर जाऊन मासेमारी करावी लागणार आहे. मागील महिनाभरात समुद्राला आलेले उधाण, त्यात समुद्रात येणाऱ्या अजस्त्र लाटा आणि त्याच्या जोडीला पाऊस आणि वारा अशा प्रतिकूल स्थितीचा सामना नव्या हंगामाच्या सुरुवातीला मच्छीमारांना करावा लागला होता. या स्थितीमध्ये सोमवारपासून पर्ससिन नेटद्वारे सुरू होणाऱ्या मच्छीमारांना नव्या हंगामाला सामोरे जावे लागणार आहे. सध्या पर्ससिन नेट मच्छीमार समुद्रामध्ये झेपावण्यासाठी सज्ज झालेले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 01-09-2025