चिपळूण : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. शनिवारी संध्याकाळी बहादूरशेख नाका येथे नाकाबंदी करीत पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून, या निवडणुकीत अवैध मद्य वाहतूक, अवैध रोकड बाळगणे आदी बाबींवर पोलिस प्रशासन लक्ष ठेवून उपविभागीय पोलिस अधिकारी असणार आहे. या अनुषंगाने राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी संध्याकाळी बहादूरशेख नाका येथे नाकाबंदी करत वाहनांची कसून तपासणी केली. या मोहिमेत कोणतीही अवैध बाब आढळून आलेली नाही.
या मोहिमेत पोलिस उपनिरीक्षक हरूगिरे, उपनिरीक्षक खोपडे, जाधव, पोलिस हवालदार गणेश नाळे आदींनी सहभाग घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 21/Oct/2024









