रविवारी पुन्हा परतीच्या पावसाने रत्नागिरीला झोडपले..

रत्नागिरी : गेले आठवडाभरापेक्षा अधिक काळ ठाण मांडलेल्या परतीच्या पावसाने रविवारी सायंकाळपासूनच रत्नागिरीत हजेरी लावली. रविवारी सकाळी पावसाने उघडीप घेत वातावरण कोरडे केले. गेले चार दिवस रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे दिवसा तर रात्रीही सातत्य होते. मात्र, शुक्रवारनंतर शनिवारी पावसाने उघडीप घेतली होती.

बंगालच्या उपसागारातील कमी दाबाची प्रणाली प्रभावहीन ठरल्याने शनिवारी पाऊस ओसरला तरी रविवारी सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह आणि विजांचा लखलखाट करत पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, शनिवारी पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यात भात कापणीच्या कामांना वेग आला होता.मात्र रविवारी पुन्हा पावसाने जोर केल्याने भात कापणीच्या कामाचा खोळंबा झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 21-10-2024