चिपळूण : गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणाच्या अनुषंगाने चिपळूण पोलिस ठाणे येथे दंगा काबू योजना घेण्यात आली. तसेच शहरात रुट मार्च घेण्यात आला. या वेळी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे उपस्थित होते. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ व्हावी, या उद्देशाने हे दोन्ही उपक्रम घेण्यात आले.
या वेळी माहिती देताना पोलिस निरीक्षक मेगडे म्हणाले, ‘चिपळूण शहरात सर्वच धार्मिक सण मोठ्या उत्साहात साजरे जातात; मात्र, या काळात सामाजिक सलोखा व शांतता टिकवणे आवश्यक असते. नागरिकांनी उत्सवकाळात शांतता, भाईचारा वऐक्य जपावे, असे आवाहनही त्यांनी केले. रूटमार्चच्या माध्यमातून आम्ही शहरातील नागरिकांना सुरक्षिततेची हमी दिली. सकाळी ११ ते दुपारी बाराच्या दरम्यान चिपळूण शहरामध्ये भोगाळे-एसटी स्टैंड-चिंचनाका-पालिका-बाजारपेठ-भेंडीनाकापर्यंत रूट मार्च काढण्यात आला. या वेळी ४ अधिकारी, २२ अंमलदार, ३२ होमगार्ड, १ आरसीपी प्लाटून असे हजर होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:28 PM 01-Sep-2025














