Devrukh : डाव्या हाताने आशीर्वाद देणारी जर्मन गणेशमूर्ती

संगमेश्वर : देवरुख येथे डाव्या हाताने आशीर्वाद देणारी जर्मन गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. डाव्या हाताने आशीर्वाद देणारी ही मूर्ती दुर्मीळ आहे. गणेशमूर्ती ही खरंतर उजव्या हाताने आशीर्वाद देते. डाव्या हातावर प्रसादरूपी मोदक असतो. मात्र, देवरुख येथील डॉ. सौरभ घाणेकर यांच्या घरी परंपरेनुसार विराजमान होणारी गणेशमूर्ती ही डावा हात आशीर्वाद देणाऱ्या रुपातील पुजली जाते. यासाठी ही मूर्ती वेगळी तयार करुन घेण्यात आली आहे. अनेक वर्षे मातीची मूर्ती देवरुखमधील प्रसिद्ध मूर्तिकार उदय भिडे तयार करत होते. आता वयोमानाने त्यांनी गणेशमूर्ती तयार करणे बंद केल्यामुळे यंदा श्री. घाणेकर यांनी कारेकर यांच्या हस्त कौशल्यातून ही गणेशमूर्ती तयार करुन घेतली आहे. या गणेशाला जर्मन गणेश असे नाव आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:00 PM 01-Sep-2025