Ratnagiri : मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे काम मंद गतीने

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम गेल्या अनेक महिन्यांपासून धिम्यागतीने सुरू आहे. या इमारतीचे काम अपूर्ण असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अत्यंत संकुचित व असुविधाजनक जागेत थांबावे लागत आहे.

अपुऱ्या जागेमुळे तपासणी, औषध वितरण यांसारख्या सेवांवर मर्यादा येत आहेत. विशेषतः वृद्ध, लहान मुले व गर्भवती महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक रुग्णांना उपचारासाठी लांबच्या ठिकाणी जावे लागते, ज्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहेत. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही काम पूर्ण होण्याची गती नाही. आरोग्य सेवेसारख्या जीवाभावाच्या विषयात विलंब परवडणारा नाही. काम त्वरित पूर्ण व्हावे, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आता संबंधित विभागाने याकडे गांभीयनि लक्ष देऊन लवकरात लवकर काम पूर्ण करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:30 PM 01-Sep-2025