आमदार राजन साळवी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार

राजापूर : राजापूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आ. राजन साळवी गुरुवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज ठाकरे गटाकडून दाखल करणार आहेत, अशी माहिती त्यांनी शुक्रवारी दिली.

गुरुवारी सकाळी १० वाजता शहरातील डॉ. आंबेडकर भवन येथे छोटेखानी सभा होणार असून, त्यानंतर वाजत- गाजत जोरदार शक्तिप्रदर्शन करत साळवी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दि. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून, २२ ते २९ ऑक्टोबर अशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे सेनेकडून विद्यमान आमदारांना रिंगणात उतरविण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पक्षाकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, साळवी यांनी आपण २४ रोजी राजापूर-लांजा- साखरपा विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 21-10-2024