लांजा : तोंडावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलिस ठाण्यामार्फत शनिवारी रात्रीपासून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी २० वाहनांवर कारवाई करण्यात आली.
विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर जिल्हा पोलिस प्रशासन अलर्ट झाले आहे. निवडणुकीत अवैध दारू वाहतूक व अवैध रोकड बाळगणे, यासह अन्य अवैध बाबींवर पोलीस प्रशासन लक्ष ठेवून असणार आहे. निवडणूक कालावधीत अनुचित प्रकार घडू नये, यासाठी लांजा पोलीस ठाणे सतर्क होऊन शहरात व शहर प्रवेश असणारी ठिकाणी वाहनाची कडक तपासणी करत आहेत. लांजा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे हे स्वतः नाकाबंदी ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन वाहनाची तपासणी करत आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा शहरातील कोर्ले तिठा, साटवली रोड, वाडगाव रोड- गणपती मंदिर, कुवे गणपती मंदिर या ठिकाणी पोलिसांची गस्त सुरू झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 21/Oct/2024









