Lanja : कुवेत संशयितरीत्या फिरणाऱ्या प्रौढाविरुद्धात गुन्हा

रत्नागिरी : संशयितरीत्या भटकणाऱ्या प्रौढाविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामचंद्र पुणाजी मणसे असे संशयिताचे नाव आहे. ही घटना कुवे-गणपतीमंदिर आवार (ता. लांजा) येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हा लांजा पोलिस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यात होता. रविवारी (ता. ३१) संशयित रामचंद्र मणसे हा कुवे गणपती मंदिर आवारात चोरीच्या उद्देशाने संशयितरीत्या भटकत असताना आढळला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सुयोग वाडकर यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 02-Sep-2025