वडीगोद्री : वडिगोद्री येथे ओबीसी आंदोलकांनी रस्ता रोको केलाय. त्यामुळे पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आंदोलकांकडून रास्ता रोको केला जातोय. पोलीस आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवाय संतप्त आंदोलकांकडून पोलिसांशी हुज्जत देखील घातली जात आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी काल रात्रीपासूनच अंतरवाली सराटी जवळ चोख बंदोबस्त ठेवला.
अंतरवाली सराटी आणि वडीगोद्रीचा रहदारीचा रस्ता एकच
सध्या वडीगोद्रीमध्ये तणावाची परिस्थिती आहे. मराठा आंदोलक जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत. यांचं मुख्य कारण म्हणजे अंतरवाली सराटी आणि वडीगोद्रीचा रहदारीचा रस्ता एकच आहे. मराठा आंदोलक अंतरवाली सराटीकडे जात असताना ओबीसींकडून रस्ता रोको करण्यात येतोय. त्यामुळे
त्यामुळे मराठा ओबीसी आंदोलक आमने-सामने आल्याचे चित्र आहे. मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने-सामने आले आहेत.
मराठा आंदोलकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न
मराठा आंदोलक अंतरवाली सराटीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. ओबीसी आंदोलकांनी रस्ता रोको केल्यामुळे पोलीस मराठा आंदोलकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण काही आंदोलक वडीगोद्री येथे जाण्याचा आग्रह करत आहेत. त्यामुळे घोषणाबाजी देत दोन्हीकडील आंदोलक आमने-सामने येत आहेत.
काही अनुचित प्रकार घडला आणि दंगल झाली तर याला फडवणीस आणि भुजबळ जबाबदार
मनोज जरांगे पाटील म्हणाले, दंगल घडली तर भुजबळ, फडणवीस आमदार असते. रस्ता अडवून चालनार नाही. आम्ही वडी गावची आम्ही इज्जत करतो, दादागिरी करायची नाही. अंतरवालीमध्ये येणाऱ्या मराठा समाजातील नागरिकांनी ज्या रस्त्याने आले त्याच रस्त्याने जायचे. काही अनुचित प्रकार घडला आणि दंगल झाली तर याला फडवणीस आणि भुजबळ जवाबदार राहतील. भुजबळांचे ऐकू नका मराठ्यांनी शांततेत यायचे. शांततेत जायचे DYSP यांनी विनंती केली म्हणून ज्या रस्त्याने यायचे त्या रस्त्याने जायचे नाही. आग्यामोहळ शांत होत नसते, असंही जरांगे म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:56 21-09-2024