जाकादेवी : तालुक्यातील निवळी ते चाफे येथील ग्रामीण भागात २८ ऑगस्ट रोजी रात्री ९.३२ वाजण्याच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित झाला. निवळी ते चाफे ३३ केव्ही मेन लाईन ऐन गणपती उत्सवामध्ये नादुरुस्त झाल्याने सर्वत्र अंधाराचे जाळे पसरले होते. असे असताना महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने आपल्या जीवाची पर्वा न करता ऐन रात्री जोरदार पाऊस, वारा अशा परिस्थितीला सामोरे जात जिद्दीने दुरुस्ती खंडित झालेला पुरवठा पूर्ववत सुरळीत केला. त्यामुळे असंख्य ग्राहकांना दिलासा मिळाला.
३३ केव्ही निवळी ते चाफे मेन लाईन दुरुस्त करून सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा अवघ्या एक ते दीड तासाच्या आत सुरळीत केल्याबद्दल शाखा कार्यालय जाकादेवी तसेच शाखा कार्यालय मालगुंडचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व गावांतील वीजधारकांनी धन्यवाद दिले आहेत.
महावितरणच्या ग्राहकांनादेखील गणपती उत्सवामध्ये काही तास अंधाराचा सामना करावा ग्राहकांनी ऐन लागला, तरीही सणासुदीच्या दिवसात आपला संयम दाखवला. महावितरण अधिकारी जाकादेवी शाखा अभियंता राजेंद्र पवार, मालगुंड शाखा अभियंता राहुल देशमुख यांनी तातडीने धावपळ करून वीज पुरवठा कमी अवधीत सुरळीत केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 03-Sep-2025











