रत्नागिरी : भंडारपुळ्यात गावठी दारू बाळगणाऱ्यावर गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील भंडारपुळे येथील जंगलमय भागात गावठी दारू विक्रीसाठी बाळणाऱ्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.५० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

सुजित रोहिदास पाटील (३६) असे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्यांच्या विरोधात पोलिस कॉन्स्टेबल नीलेश गुरव यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी सायंकाळी संशयित हा विनापरवाना आपल्या ताब्यात ५२० रुपयांची ५ लिटर गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 21/Oct/2024