Virat Kohli Fitness Test : किंग कोहलीने लंडनमध्ये दिली फिटनेस टेस्ट, पास की नापास?

Virat Kohli Fitness Test In London : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली पुन्हा मैदानात उतरायला आतुर झाला आहे. यासाठी तो जोरदार सराव करत असून त्याने फिटनेस टेस्टही उत्तीर्ण केली आहे.

पण यात विशेष बाब म्हणजे कोहलीने ही फिटनेस टेस्ट बंगळुरूच्या BCCI राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये न देता इंग्लंडमध्ये दिली.

आता लंडनमध्ये फिटनेस चाचणी देण्यावरून वाद निर्माण झाला आहे. बहुतेक भारतीय खेळाडू त्यांच्या फिटनेस टेस्टसाठी बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे गेले होते, गेल्या आठवड्यात रोहित शर्मा सहित इतर अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये ही टेस्ट दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, कोहली पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळताना दिसू शकतो. (Virat Kohli takes fitness test in England under BCCI’s supervision)

इंग्लंडमध्ये दिली फिटनेस टेस्ट

अहवालानुसार, विराट कोहलीने इंग्लंडमध्ये बीसीसीआयच्या देखरेखीखाली फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केली आहे. परदेशी भूमीवर ही टेस्ट देणारा तो सध्याच्या पिढीतील पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. यासाठी त्याने बोर्डाची पूर्वपरवानगी घेतली होती. सध्या कोहली आपल्या कुटुंबासह लंडनमध्ये आहे. बीसीसीआयच्या फिजिओथेरपिस्ट आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग तज्ज्ञांच्या टीमने सर्व खेळाडूंच्या फिटनेस अहवालासह कोहलीचा अहवालही बोर्डाकडे सादर केला.

खरं तर, विराट हा एकमेव खेळाडू होता ज्याची चाचणी देशाबाहेर घेण्यात आली होती. इतर कोणत्याही खेळाडूने अशी सूट मागितली नव्हती. जेव्हा बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याला विराटच्या प्रकरणाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी सांगितले की कोहलीने अशी सूट मागितली असेल आणि बीसीसीआयकडून परवानगी मागितली असेल. पण, अहवालात असेही म्हटले आहे की अशी सूट मागणाऱ्या इतर कोणत्याही खेळाडूला अशी सूट देता येईल का हे अद्याप माहित नाही.

अजून या खेळाडूंची होणार चाचणी

मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा, के.एल. राहुल, ऋषभ पंत, आकाश दीप आणि नितीश रेड्डी हे खेळाडू या महिन्यात फिटनेस चाचणी देतील. याशिवाय, जे खेळाडू दुखापत किंवा आजारपणामुळे पहिल्या टप्प्यात चाचणी देऊ शकले नाहीत, तेही यावेळी सहभागी होतील. त्यापूर्वी आधीच अनेक खेळाडूंनी फिटनेस चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

‘या’ खेळाडूंनी फिटनेस टेस्ट केली पास

रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्माची फिटनेस टेस्ट गेल्या आठवड्यात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये घेण्यात आली होती, ज्यामध्ये तो पास झाला होता. याशिवाय मोहम्मद सिराज, शुबमन गिल, जितेश शर्मा, प्रसिद्ध कृष्णा, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, हर्षित राणा, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रजत पाटीदार, रवी बिश्नोई, संजू सॅमसन, शिवम दुबे, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, मुस्लीम कुमार कुमार, मुहम्मद सिराज, तिलक वर्मा, अभिमन्यू इसवरन, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, ध्रुव जुरेल, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि यशस्वी जैस्वाल यांनीही फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:00 03-09-2025