रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय बाळकृष्ण चव्हाण हे ३० ऑगस्ट २०२५ रोजी बँकेतील ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्तीवेळी बँकेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे आणि संचालकांनी सत्कार केला.
अजय चव्हाण यांची जिल्हा बँकेत क्षेत्रीय कार्यालय चिपळूण येथे १६ जुलै १९९० रोजी क्षेत्रीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. २०११ पर्यंत चव्हाण यांनी क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम केले. २०१४-१५ मध्ये जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट अधिकारी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. त्यानंतर चव्हाण यांना सामान्य प्रशासन माहिती विभागात सहायक सरव्यवस्थापकपदी, तर २०१७मध्ये चिपळूण विभागीय कार्यालयात उपसरव्यवस्थापकपदी पदोन्नती देण्यात आली. १ नोव्हेंबर २०१८ रोजी सरव्यवस्थापकपदी सामान्य प्रशासन व कर्ज नियोजन विकास विभागात पदोन्नती दिली गेली. सेवाज्येष्ठतेने त्यांना १३ एप्रिल २०२२ रोजी बँकेच्या व्यवस्थापकीय श्रेणीत मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पदोन्नती दिली गेली.
सत्कारावेळी संचालक गजानन पाटील, मधुकर टिळेकर, रामचंद्र गराटे तसेच नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर गिम्हवणेकर, कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी जितेंद्र साळवी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:31 04-09-2025














