chiplun : चिपळुणात आज ‘मनसे’ची बैठक

चिपळूण : मनसेचे कोकण विभागीय नेते वैभव खेडेकर व अन्य पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मनसे सतर्क झाली असून मनसे पदाधिकाऱ्यांच्यावतीने चिपळूणमध्ये ४ सप्टेंबर रोजी दुपारी शहरातील अतिथी सभागृहात मनसे कार्यकत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव, शिरीष सावंत, नितीन सरदेसाई यांच्या आदेशानुसार जिल्हा सचिव सचिन गायकवाड, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर तसेच गुहागर तालुका अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या माध्यमातून या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी मनसेचे जिल्ह्यातील कार्यकारिणी सदस्य, सर्व तालुकाध्यक्ष, सहसंपर्क अध्यक्ष, शहर अध्यक्ष, उपतालुकाध्यक्ष, विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, गट अध्यक्ष आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी मनसेच्या बैठकीला कोणते पदाधिकारी उपस्थित राहतात हे महत्त्वाचे ठरणार असून त्यातून खेडेकर यांच्याबरोबर मनसेचे किती पदाधिकारी जातात हे स्पष्ट होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 04/Sep/2025