रत्नागिरी : बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थानतर्फे ‘फास्ट फूड प्रशिक्षण वर्ग’ आयोजित करण्यात आला आहे. हा प्रशिक्षण वर्ग ११ ते ३० सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.
या प्रशिक्षणात सँडविच, पुलाव, पाणीपुरी, भेळ, शेवपुरी, दहीपुरी, कचोरी, समोसा, नूडल्स, फ्राईड राईस, कोबी मंच्युरियन, पावभाजी, कांदा भजी, बर्गर, कटलेट, वडापाव, चिकन चिली, चिकन फ्राईड राईस, बिर्याणी, चिकन ६५, अंडा मसाला अशा लोकप्रिय पदार्थांच्या तयारीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. चहा, नाश्ता, जेवण व राहण्याची सोय मोफत उपलब्ध करून दिली जाईल. उद्योजकता व व्यक्तिमत्त्व विकासासाठी मार्गदर्शन केले जाईल. शासकीय प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. वयोमर्यादा १८ वर्षांपासून ४५ वर्षांपर्यंत आहे. उमेदवार जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवार उमेद स्वयंगटातील सदस्य अथवा कुटुंबातील व्यक्ती तसेच BPL/SECC/MGNREGA लाभार्थी असणे गरजेचे आहे. दररोज सकाळी ९.३० ते सायं. ५.३० या वेळेत प्रशिक्षण होईल. आधारकार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, फोटो इत्यादींची छायांकित प्रती आवश्यक आहेत. या प्रशिक्षणातून युवक-युवतींना केवळ फास्टफूड बनवण्याचे कौशल्यच नव्हे तर लघुउद्योजकतेकडे वाटचाल करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगारक्षम बनवण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याने जिल्ह्यातील तरुणाईमध्ये या प्रशिक्षणाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 04/Sep/2025











