राजापूर : राजापूर तालुक्यातील शीळ येथील घरगुती गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान सोन्याच्या चैन चोरीची घटना घडली आहे. ही घटना २ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शिळफाटा येथे घडली.
प्रशांत विष्णू गुरव (वय ४५, रा. बंगलवाडी) हे विसर्जन मिरवणुकीत नाचत चालत असताना शिळफाटा हनुमान मंदिराजवळ जमलेल्या लोकांमध्ये सहभागी झाले. त्याच वेळी त्यांच्या गळ्यातील सुमारे १८ ग्रॅम वजनाची, तीस हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हरवली किंवा चोरीस गेल्याचा संशय आहे.
या प्रकरणी गुरव यांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून ३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:07 PM 04/Sep/2025









