लांजा : खासगी बसने कणकवली (जिल्हा सिंधुदुर्ग) येथून मुंबई येथे उपचारासाठी जाणाऱ्या महिलेला प्रवासादरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने तिला लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना आज बुधवार ३ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेहल संतोष राणे (वय ५१ वर्षे) या शिक्षक असून त्या ओझरम माळवाडी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील रहिवासी आहेत. सौ स्नेहल राणे हिला डायबेटिसचा आजार असल्याने ती आपला पती संतोष दत्तात्रय राणे (वय ५३ वर्षे) यांच्यासोबत औषधोपचारासाठी तरळे येथून मुंबई-विरार येथे ट्रॅव्हल्स ने जात असताना लांजा तालुक्यातील कुवे येथे ट्रॅव्हल्स आली असता स्नेहल हिला प्रवासा दरम्यान अचानकपणे अस्वस्थ वाटू लागल्याने आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पती संतोष राणे यांनी तिला पहाटे लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी तिच्यावर उपचार सुरू असतानाच येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.
याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 04/Sep/2025














