खेड : तळे जांभूळवाडी जिल्हा परिषद शाळेत मिशन आपुलकी उपक्रम

खेड : तालुक्यात तळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळे जांभूळवाडी येथे मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत नुकताच शाळेला स्मार्ट टीव्ही व कलर प्रिंटर प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे व डिजिटल जगामध्ये विद्यार्थी प्रगत व्हावे यासाठी शिक्षक नीलेश कांदेकर व मुख्याध्यापक रवींद्र ईटकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे माजी विद्यार्थी कुडोशी गावचे सुपुत्र पिंपरी पुणे येथील माजी नगरसेवक प्रदीप धुमाक यांच्या माध्यमातून शाळेला डिजिटल स्मार्ट टीव्ही प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे आंबये गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते उद्योजक दिलीप कोतेरे यांच्याकडून शाळेला कलर प्रिंटर देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संतोष बुरटे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 21/Oct/2024