ST BUS : परती प्रवासाठी आरवलीतून बससेवा

आरवली : गणेशोत्सवानंतर परतीला लागलेल्या कोकणवासीयांसाठी आरवली येथून थेट बससेवा उपलब्ध करण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. गणेशोत्सवानंतर कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी आरवली येथील महामार्ग उड्डाणपुलाखाली उभी असलेली एसटी, या वेळच्या गणेशोत्सवासाठी रेल्वे महामंडळाच्या गाड्या तसेच खासगी वाहनांनी मोठ्या प्रमाणावर मुंबई एसटी पुण्यातील कोकणवासीय दाखल झाले होते.

कोकणवासीयांसाठी रेल्वेने सोडलेल्या विशेष गाड्यांसह मुंबईतून मोदी एक्स्प्रेस ट्रेन तसेच विविध राजकीय पक्षांकडून सोडण्यात आलेल्या बसेस कोकणात मोठ्या संख्येने दाखल झाल्या होत्या. गौरी-गणपती विसर्जनानंतर मागील दोन दिवसांपासून मोठ्या संख्येने कोकणवासीय आपापल्या मूळ ठिकाणी परतू लागले आहेत. संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथून आरक्षित केलेल्या एसटी बसेस तसेच खासगी आराम बसेसदेखील परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 05/Sep/2025