रत्नागिरी : उद्योग कसा सुरू करावा, उद्योग सुरू करण्यासाठी लागणारे परवाने, ना हरकत प्रमाणपत्र, शासनाच्या विविध योजना व सवलती, राज्यातून विदेशात माल निर्यात कसा करावा, यासाठी शासनाकडून मिळणाऱ्या सवलती आदींबाबत मैत्री कक्षाकडून मोफत माहिती पुरवली जाते. मैत्री कक्षातर्फे १८००-२३३-२०३३ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. अधिकाधिक उद्योजकांनी या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर यांनी केले आहे.
“मैत्री कक्ष” ही महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागांतर्गत उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि गुंतवणूक वाढविण्याची संस्था आहे. जी महाराष्ट्रातील उद्योगांच्या प्रक्रिया सुलभ करण्यासाठी काम करते. जास्तीत जास्त नागरिकांनी उद्योजकांनी, नवउद्योजकांनी या सुविधेबद्दल माहिती मिळविण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 05/Sep/2025














