रत्नागिरी : मिरजोळे, मुरुगवाडा येथे गावठी दारूसह दारूचे साहित्य बाळगणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे पाटीलवाडी आणि मुरुगवाडा किरवाडी या ठिकाणी बेकायदेशिरपणे गावठी दारू आणि दारुचे साहित्य आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून एकूण १ लाख ८२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवार १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते रात्री ८ वा. कालावधीत करण्यात आली. मयूर रवि मोरे (३८, रा. कीर्तीनगर कोकणनगर, रत्नागिरी) आणि विलास एकनाथ चव्हाण (५४, रा. जुवे चव्हाणवाडी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. यातील मयूर मोरे हा आपल्या ताब्यात ४ हजार ७५० लिटर गूळ व नवसागर मिश्रीत कुजके रसायन, २० लिटर गावठी दारू बाळगून होता. तर विलास चव्हाण हा आपल्या ताब्यात २५० रुपयांची ५ लिटर दारू बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ब), (क), (ड), (फ), (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 21/Oct/2024