Lalbaugcha Raja Visrajan 2025 : गुलालाच्या उधळणीत लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Lalbaugcha Raja Visrajan 2025 : गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज (शनिवार) बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे.
मुंबईसह राज्यभरात सकाळपासूनच गणेश विसर्जन मिरवणुकांना उत्साहात सुरुवात झाली.

ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात भक्तांचा जल्लोष सुरू आहे.

मुंबईकरांचे आकर्षण असलेल्या लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा यांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.

लाखो भाविक मिरवणुकीच्या मार्गावर रांगेत उभे राहून बाप्पाच्या अखेरच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत.

“ही शान कोणाची… लालबागच्या राजाची!” या गजरात राजाची विसर्जन मिरवणूक थाटामाटात सुरू झाली आहे.

एकीकडे गुलालाच्या उधळणीत भक्तीचा महापूर वाहतो आहे तर दुसरीकडे बाप्पाच्या निरोपाने डोळ्यांत पाणी आले आहे.

दहा दिवस भक्तांना आनंद, उत्साह आणि अपार श्रद्धेचा अनुभव देणाऱ्या बाप्पाला आता “पुढच्या वर्षी लवकर या” अशा हाकेतून निरोप दिला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 06-09-2025