चिपळूण : गोविंदराव निकम विद्यालयातर्फे कागदी पिशव्यांचे सावर्डे बाजारपेठेत वाटप

सावर्डे : गोविंदराव निकम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये टाकाऊपासून टिकाऊ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना कागदी पिशव्या कशा बनवाव्यात याचे मार्गदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांनी केले. या उपक्रमांतर्गत सावर्डे बाजारपेठेत कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

विद्यालयात स्वच्छता मोहिमेंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करून समाजाला संदेश देण्याचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे व प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणाम व प्रदूषण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून सावर्डे परिसरात प्रयत्न केले जात आहेत. कागदी पिशव्यांचा वापर करून पर्यावरणाचे संवर्धन होण्यासंदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी विद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले व सात हजार पेक्षा जास्त कागदी पिशव्या तयार करून सावर्डे बाजारपेठेतील विविध दुकानांमध्ये त्याचे वाटप करण्यात आले व स्वच्छता मोहिमेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी एक अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने राबविला.

यामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना विद्यालयातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 21/Oct/2024