चिपळूण : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक व प्रशिक्षण शिबिर (ता. ८) सकाळी ११ वाजता चिपळूण येथे आयोजित करण्यात आले आहे. शहरातील धवल व्यापारी संकुल येथे ही बैठक होणार आहे, अशी माहिती उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी दिली आहे.
घाग यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर घाग यांनी उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस बळकटीकरणाच्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकण्यासाठी आढावा बैठक व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. बैठकीत संघटनात्मक आढावा घेण्याबरोबरच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले जाणार आहे. या बैठकीला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन घाग यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 08/Sep/2025














