रत्नागिरी : राज्य शासनाने जिवंत सात-बारा मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम अखेरच्या टप्प्यात असून राज्य शासनाने सात-बारासाठी दुसरा टप्पा मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी ११ मुद्द्यांची अंमलबजावणी करण्याचे आदेश आहेत. जिल्ह्यात ९ हजार ४५७ वारसांची नावे जिवंत सात-बारावर दाखल झाली आहेत. ४६ फेरफार नामंजूर झाले आहेत.
जिवंत सात-बारा मोहिमेत जिल्ह्यात ९ हजार ५१३ खातेदार मृत असल्याची नोंद आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ९ हजार ४५७ वारसांची नावे जिवंत सात-बारावर दाखल झाली आहेत. ४६ फेरफार नामंजूर झाले आहेत. जिवंत सात-बारा मोहिमेत जिल्ह्यात ९ हजार ५१३ खातेदार मृत असल्याची नोंद आहे. जिवंत सात-बारा वारस नोंदीसाठी ई-हक्क प्रणालीत ४ हजार ५११ वारस नोंद अर्ज दाखल करण्यात आले. तसेच या मोहिमेत वारस नोंद अर्जानुसार एकूण वारस ठराव सात-बारावर नोंदी करताना महिला वारसदारांच्या नोंदी होत नाहीत. अशा महिला वारसदारांच्या नोंदी होत नाहीत. अशा महिला वारसदारांच्या नोंदी करण्याच्या सूचना आहेत.
या सोबतच अनेक सात-बारांवर पोटखराबा क्षेत्र नोंदविले गेले आहे. संपूर्ण राज्यभरात सात-बारावर मृत शेतमालकांच्या नोंदी आहेत. यामुळे वारसांची नावे चढलीच नव्हती, असे निदर्शनात आहेत. यामुळे वारसाची नावे चढलीच नव्हती, असे निदर्शनात आल्याने अशा मृतांच्या सात-बारावर जिवंत वारसांची नावे चढविण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. सात-बारावरील नावामुळे शेतकऱ्यांना मिळणारा अग्रीस्टॉक नंबर आणि शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळत नव्हता.
आता या मोहिमेमुळे सात-बारावरील मृतांची नावे वगळण्यात आली आहेत. त्या जागेवर वारसांची नावे चढविण्यात आली आहेत. या मोहिमेमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. जिल्ह्यात ९ हजार ४५७ वारसांची नावे जिवंत सात-बारावर दाखल झाली आहेत. ४६ फेरफार नामंजूर झाले आहेत. जिवंत सात-बारा मोहिमेत जिल्ह्यात ९ हजार ५१३ खातेदार मृत असल्याची नोंद आहे. जिवंत सात-बारा वारस नोंदीसाठी ई-हक्क प्रणालीत ४ हजार ५११ वारस नोंद अर्ज दाखल करण्यात आले. मोहिमेत वारस नोंद अर्जानुसार एकूण वारस ठराव निर्णयांची संख्या ९ हजार ५०३ इतकी होती. या अर्जाची पडताळणी करून त्यावरील मृतांची नावे कमी करून फेरफारामध्ये ९ हजार ४५७ जणांची नावे सात-बारावर चढली आहेत. दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या जिवंत सात-बारा मोहिमेत ११ मुद्द्यांचा समावेश होणार आहे. महिला वारसदारांच्या नोंदी प्रामुख्याने करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
जिवंत सात-बाराचा शेतकऱ्यांना लाभ जिवंत सात-बारा मोहिमेत सात-बारावरील मृतांची नावे काढून टाकली आहेत. त्या जागेवर त्यांच्या वारसांचे नाव चढवायचे आहे. यामुळे सात-बारावर मिळणारे लाभ शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 08/Sep/2025














