रत्नागिरी : तालुक्यातील निवळी-बावनदी उतारात कंटेनर निष्काळजीपणे चालवून स्वतःच्या मरणास व वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत झालेल्या कंटेनर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाष जगतपाल वर्मा (वय २३, रा. बन्डा, खुटार, छातरपूर, प्रतापगड, उत्तरप्रदेश) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी निवळी-बावनदी सुतारवाडी येथील वळणावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी कंटेनरचालक सुभाष वर्मा याने कंटेनर निष्काळजीपणे चालवल्यामुळे उलटला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 08/Sep/2025














