मानवी जीवनात संस्काराला अधिक महत्त्व : कांचन पालव

मंडणगड : मानवी जीवनात संस्काराला खूप महत्त्व आहे. संस्काराशिवाय जीवन शून्य असून, चांगले संस्कारच समाजाला श्रेष्ठ बनवतात. सर्वोत्तम जीवनाचा पाया उत्तम संस्कारांवरच अवलंबून असतो. आपल्यावर चांगले संस्कार नसतील तर आपले जीवन हे भरकटलेल्या जहाजाप्रमाणे आहे. यासाठी लहानपणापासूनच चांगल्या सवयी हव्यात. एक चांगला मानव व आदर्श नागरिक बनविण्याची सुरुवात घराघरातूनच होणे आवश्यक असल्याचे ‘जीवन विद्या मिशन’च्या कांचन पालव यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभागामार्फत ‘जीवन विद्या मिशन’ अंतर्गत ‘विद्यार्थी संस्कार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कांचन पालव बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे घराघरातूनच होणे आवश्यक असल्याचे ‘जीवन विद्या मिशन’च्या उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 21/Oct/2024