खेड : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दि. २० रोजी लोटे औद्योगिक वसाहत परिसरात आवाशी ते सीईटीपी दरम्यानचा नाल्यावरील छोट्या पुलावर कार तसेच एस. टी. बस यांची धडक झाली. अपघात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असले तरी कोणीही जखमी झालेले नाही.
रविवारी दि.२० रोजी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी कार लोटे औद्योगिक वसाहतीतील जात असताना आवाशी ते सीईटीपी दरम्यान असलेल्या नाल्यावरील छोट्या पुलावर आली असता रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात कारचालकाचे नियंत्रण सुटले व बाजूने पुढे जाणाऱ्या चिपळूण ते खेडच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसवर कार धडकली. अपघातात सुदैवाने कोणी जखमी झाले नसले तरी दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. मुंबई – गोवा महामार्गावर पडलेले खड्डे अपघातास कारणीभूत ठरत असल्याने प्रवासी व वाहनचालक याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 21/Oct/2024














