Ratnagiri : जिल्ह्यात वातावरण बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनमध्ये वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, वातावरणात बदल होत असून कधी उन्ह तर कधी गारवा, ढगाळ वातावरण पडत आहे. तर कधी अचानक पावसाची बरसात होत आहे. सततच्या वातावरण बदलामुळे ताप, थंडी, डोकेदुखी, सर्दी, घशातील खवखव, खोकल्याचे प्रमाण वाढले असून रत्नागिरीमधील सिव्हील हॉस्पीटलच्या ओपीडीसह खासगी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात तीन महिने पावसाने दमदार हजेरी लावली होती. सप्टेंबर महिन्यात पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शहर, जिल्ह्यातील वातावरणात बदल होत असून, कधी ऊन तर कधी थंडी, ढगाळ वातावरण होत आहे. दिवस गरम तर रात्री थंडी बाजत आहे. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, ताप, खोकला यासह डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियाचे संशयित रुग्ण ही आढळत आहेत. साथीच्या आजाराने डोके पुन्हावर काढले आहे. शहरासह ग्रामणी भागातील रुणालये, सिव्हील हॉस्पीटलचे ओपीडीत गर्दी वाढत आहे.

सध्या शहर व ग्रामीण परिसरातील अनेक कुटुंबातील एकाचवेळी दोन ते तीन सदस्य आजारी पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, तापासह अन्य लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तीन महिन्यांत आढळले ६ डेंग्यूचे रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. पावसाच्या उसंतीनंतर साथीच्या आजाराने डोकेवर काढले होते. आठ महिन्यांत तब्बल १५ डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. तर पावसाळ्यात तीन महिन्यांत ६ रुग्ण आढळले होते. संशयित रुग्ण वाढत असून, उपचार घेऊन बरे होत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 09/Sep/2025