Aishwarya Rai Bachchan: अभिनेत्री ऐश्वर्या रायची हायकोर्टात धाव!

Aishwarya Rai Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचली आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) हिने ‘पर्सनॅलिटी राईट्स’च्या संरक्षणासाठी याचिका दाखल केली आहे.

परवानगी शिवाय फोटो व्यवसायिक जाहिराती करणाऱ्यांविरोधात ऐश्वर्याने दिल्ली उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या फोटोंचा परवानगी शिवाय वापर

ऐश्वर्या रायच्या वकिलांनी न्यायालयाला त्या वेबसाइट्स आणि कंटेंटबद्दल माहिती दिली, ज्यावर तिच्या नावाचा आणि फोटोंचा व्यावसायिक वापर परवानगीशिवाय केला जात आहे. न्यायालयात वकिलांनी एका वेबसाइटचा दाखला देत सांगितले की, अभिनेत्रीने त्यांना परवानगी दिलेली नाही, तरीही फोटो वापरले जात आहेत. दुसऱ्या वेबसाइटवर ऐश्वर्या राय यांचे वॉलपेपर आणि फोटो टाकण्यात आले आहेत, तर तिसऱ्या कंपनीकडून त्यांच्या फोटोंचे प्रिंट असलेले टी-शर्ट्स विकले जात आहेत. परवानगीशिवाय अशा प्रकारच्या कृती त्यांच्या वैयक्तिक हक्कांचे उल्लंघन आहेत आणि त्या थांबवणे अत्यंत आवश्यक आहे, असा युक्तीवाद ऐश्वर्या रायच्या वकिलांनी केला आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर ती पोन्नियिन सेल्वन या चित्रपटात ती झळकलेली पाहायला मिळाली होती. या चित्रपटाचे दोन भाग आले होते. पहिला भाग 2022 मध्ये आणि दुसरा भाग 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ऐश्वर्या रायने ‘नंदिनी’ ही भूमिका साकारली होती आणि त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. याआधी ऐश्वर्या फन्ने खान, ए दिल है मुश्किल, सरबजीत, जज्बा यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली होती.

ऐश्वर्या राय हिने 1997 साली ‘और प्यार हो गया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने बॉलिवूडला अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. चित्रपटांबरोबरच ऐश्वर्या जाहिरातींमधूनही मोठी कमाई होते. अशा परिस्थितीत त्यांचा आरोप आहे की, काही उत्पादनांनी त्यांचे एआय जनरेटेड फोटो वापरले आणि त्यासाठी त्यांची परवानगीसुद्धा घेतली नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:27 09-09-2025