चिपळूण : कामठे खुर्द (हरेकरवाडी), चिपळूण येथील प्रदीप नारायण लिबे (वय 47) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रदीप लिबे हे जिप्सी कॉर्नर हॉटेलमध्ये कामाला होते. एक सप्टेंबर 2025 रोजी दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी हॉटेल मालक यांच्या मालकीची मोटारसायकल घेऊन घरी जात असताना गुहागर बायपासजवळ मुंबई-गोवा महामार्गावर ही मोटारसायकल स्लीप झाली. त्यात ते गंभीर जखमी झाले. डोक्याला तसेच हात-पायाला दुखापत झाल्याने त्यांना प्रथम लाइफ केअर हॉस्पिटल, चिपळूण येथे दाखल करण्यात आले.
त्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. चार सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4.45 वाजता प्रदीप लिबे यांचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:45 PM 09/Sep/2025














