दापोली : दापोली महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य सचालनालय आयोजित आणि कै. महाजन स्मृतिप्रतिष्ठानमार्फत आयोजन केलेला दापोली सांस्कृतिक महोत्सब दि. १४ व १५ ऑक्टोबर रोजी सर विश्वैश्वरैय्या सभागृह येथे अत्यंत दिमाखात संपन्न झाला, अभिनेता ओंकार भोजने यांची खास उपस्थिती या महोत्सवाला होती.
या महोत्सवाचे हे पहिलच वर्ष होते, तरीदेखिल दोन्ही दिवसांच्या सर्व कार्यक्रमांना दापोलीकरांनी उदंड प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्रसंगी मिहीर महाजन यांनी सांगितले की, हा महोत्सव ही आपल्या युवा कार्यकर्त्यांची एक छोटी संकल्पना होती, पण तो इतका भव्य करण्यासाठी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि आमदार उमाताई खापरे यांचे मोलाचे मार्गदर्शन प्राप्त झाले.
महोत्सवाचे उद्घाटन सरखेल कान्होजी आंग्रे यांचे थेट वंशज रहुजी आंग्रे यांच्या हस्ते आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपिन पाटणे, कार्यवाह गंगाराम इदाते, कोषाध्यक्ष दीपक महाजन, सहकार्यवाह डॉ. प्रसाद करमरकर आणि महोत्सवाचे निमंत्रक मिहीर महाजन यांच्या उपस्थितीत झाले.
उद्घाटक रघुजी आंग्रे यांनी कोकणच्या संस्कृतीची आणि ऐतिहासिक वारश्याची नाळ जोडत, आजचा महोत्सव किती समर्पक आहे, यावर भाष्य केले. पहिल्या दिवशीचा असणारा मंदार परळीकर आणि संचाने सादर केलेला इथे मराठीचिये नगरी हा शिवचरित्र महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या लढाया, मोहिमा, राज्याभिषेक आदी विषयांवर प्रकाश टाकला. याच दिवशी प्रतिष्ठानमार्फत विविध सांस्कृतिक स्पर्धाचेदेखिल आयोजन करण्यात आले होते. सामूहिक भजन, खालुबाजा, कोकणातील लोककला चित्रकला, रांगोळी, फोटोग्राफी, रिल्स, इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले गेले असून त्याला दापोली कलाकारांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रत्येक स्पर्धेसाठी या क्षेत्रातील त्यांना आणि ज्ञानी परीक्षक निमंत्रित होते त्यामुळे परीक्षण अतिशय काटेकोरपणे पार पडले.
दुसऱ्या दिवशी या स्पर्धाचे बक्षिस वितरण, समारोप आणि तद्वंतर विदुषी सौ. मंजुषा पाटील यांच्या सुरेल गायनाचा कार्यक्रम पार पडला. बक्षीस वितरणासाठी प्रमुख अतिथी म्हणून दापोली विधानसभेचे आमदार योगेशदादा कदम, विधान परिषद आमदार उमाताई खापरे, सुप्रसिध्द सिने अभिनेते राहुल सोलापूरकर, अभिनेते ओंकार भोजने आणि समारोपाचे मुख्य अतिथी म्हणून पद्यश्री दादा इदाते उपस्थित होते, आ. योगेशदादा कदम यांनी मनोगतात अशाप्रकारचा भव्यदिव्य दापोली सांस्कृतिक
महोत्सव दापोलीत इतक्या वर्षात पहिल्यांदाच संपन्न होतो आहे. त्यामुळे भविष्यात देखिल प्रतिष्ठानतर्फे होणान्या कार्यक्रमास माझी सर्वतोपरी मदत होत राहिल तसेच आम, उमालाई खापरे यांनी निमंत्रक निहीर महाजन आणि युवा प्रेरणा कट्टा टीमचे विशेष कौतुक करीत कायमच सहकार्य करीत राहण्याची ग्वाही दिली. ओंकार भोजने यांनी मनोगतावेळी सादर केलेली त्यांची स्वरचित कविता भावनिक करणारी ठरली. तर पद्यश्री दादा इदाते यांनी समारोपाच्या भाषणात, दापोलीच्या भारतरत्नांची वैशिष्ट्ये वर्णन करीत ही संस्कृती आणि हा वारसा जतन करत पुढे नेण्यासाठी प्रतिष्ठानला शुभेच्छा दिल्या.
तसेच त्त्वर्गीय कृष्णानामा महाजनांच्या कोळथरे निवासी राहून शिकल्याने त्यांच्या परीसस्पर्शाचा मोठा वादा आपल्या यशात असल्याचे दादांनी नमूद के ले. तसेच वडीलकीच्या नात्याने, सर्व युवा प्रेरणा कहा टीमला आशीर्वाद दिला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:07 21-10-2024









