गुहागर : गुहागर तालुक्यातील विविध गावांमधून काही व्यक्ती वेगवेगळ्या कालावधीत बेपत्ता झाल्या आहेत. संबंधित व्यक्तींबाबत कोणाला माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने पोलीस निरीक्षक गुहागर पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणपत काशिराम गावणंग (वय ५१ वर्षे, रा. उंबराठ, डागवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) हे ७ जुलै २०२४ रोजी रात्री ९ ते ८ जुलै २०२४ रोजी पहाटे ४.३० यादरम्यान चिंद्रावळे, ता. गुहागर येथून बेपत्ता झाले आहेत. त्यांचा रंग सावळा, अंगाने सडपातळ, नाक सरळ, डोळे काळे, केस काळे कापलेले, उंची ५ फूट ५ इंच, नेसणीस खाकी रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व खाकी रंगाची हाफ पॅन्ट, त्यावर हिरव्या पांढऱ्या रंगाचा टॉवेल, काळ्या रंगाची टोपी आहे.
दुसरे गणपत गोविंद मुकनाक (वय ७५, रा. निवोशी गणेशवाडी, ता. गुहागर) हे २० ऑक्टोबर २०१९ रोजी निवोशी गणेशवाडी, ता. गुहागर येथून बेपत्ता झाले आहेत. उंची ५ फुट, वर्ण- सावळा, अंगाने सडपातळ, चेहरा-उभट, नाक-सरळ, केस पांढरे, दाढी मिशी-पांढरी, अंगात पांढऱ्या रंगाचा हाफ हाताचा टी-शर्ट व काळ्या रंगाची पँट आहे.
तिसरे प्रमोद महादेव पालांडे (वय ४७, रा. पाटपन्हाळे, गणेशवाडी, ता. गुहागर) हे ७ एप्रिल २०२१ रोजी पाटपन्हाळे, गणेशवाडी येथून बेपत्ता झाले.
चौथे संदेश शंकर पवार (३०, रा. अंजनवेल, मराठवाडी, ता. गुहागर) हे अंजनवेलमधील मराठवाडी येथून सन २०१२ मध्ये बेपत्ता झाले आहेत. पाचव्या सुनंदा नामदेव मुरमुरे (६०, रा. दोडवली, नामदेववाडी, ता. गुहागर) या त्यांच्या राहत्या घरातून १३ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी ७.२२ वाजता बेपत्ता झाल्या आहेत. त्यांची उंची ५० फूट ४ इंच, अंगाने मध्यम, रंग सावळा, चेहरा उभट, नाक सरळ, कानात साधी कर्णफुले आहेत. सहाव्या विनीता शंकर वेलुंडे (वय ५१, रा. सडे जांभारी खालचीवाडी, ता. गुहागर) या २०२२ रोजी पहाटे ६ वाजता सडेजांभारी गुहागर येथून बेपत्ता झाल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 10/Sep/2025












