Mahavitaran : महावितरणच्या कारभाराविरोधात चिपळुणातील व्यापारी, नागरिक आक्रमक

चिपळूण : अनेक दिवसांपासून महावितरणच्या कारभाराविरोधात चिपळुणातील व्यापारी व नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. याची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी शहरातील व्यापारी, नागरिक, महावितरण, नगर परिषद प्रशासन अशी एकत्रितरित्या बैठक आयोजित केली आहे. १८ सप्टेंबला सायंकाळी ४ वा. ही बैठक न.प. समोरील सावरकर सभागृहात होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवसातून अनेकवेळा वीजपुरवठा खंडीत होत असल्याने शहरातील व्यापारी व नागरिक हैराण झाले आहेत. या गंभीर विषयाची दखल घेत आ. निकम यांनी पुढाकार घेत बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत महावितरण बाबतच्या सर्व प्रश्नांवर विस्तृत चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरी व व्यापारी बांधवांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात दिनांक १५ सप्टेंबरपर्यंत चिपळूण व्यापारी महासंघटनेचे सचिव उदय ओतारी यांच्याकडे द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 10/Sep/2025