Ratnagiri : विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीचा भार आता शिक्षकांवर

रत्नागिरी : राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची आधार नोंदणी प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी, यासाठी शिक्षण विभागाने कडक सूचना दिल्या आहेत; मात्र या कामाचा संपूर्ण भार थेट शिक्षकांच्या खांद्यावर टाकण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

विद्यार्थ्यांची नावनोंदणी, परीक्षेची तयारी, शैक्षणिक उपक्रम यासोबतच आता आधार नोंदणीसारख्या तांत्रिक व प्रशासकीय कामात शिक्षकांना गुंतवले जात आहे. शिक्षण विभागाकडून आलेल्या आदेशानुसार, ३० सप्टेंबरपर्यंत सर्व विद्यार्थ्यांची आधार माहिती अद्ययावत करणे शाळांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे अनेक शिक्षकांना शाळेतील नियमित अध्यापनासोबतच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ द्यावा लागत आहे.

पालक आणि विद्यार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे जमा करणी, आधारकेंद्राशी समन्वय ठेवणे आणि ऑनलाइन नोंदणी व्यवस्थित पार पडावी यासाठी शिक्षकांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ग्रामीण भागातील इंटरनेट व विजेच्या समस्येमुळे हे काम वेळेत पूर्ण करणे आव्हानात्मक ठरत आहे. शिक्षक संघटनांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 10/Sep/2025