चिपळूण : शहरातील पाग येथे राहणाऱ्या दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून मराठा समाजाच्या विरोधात अवमानकारक बोलल्याप्रकरणी व दोन समाजात तेढ निर्माण होईल अशाप्रकारे वक्तव्य केल्याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी पाग येथे राहाणारा मयूर मधुकर भोजने याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. या बाबत मराठा समाजबांधवांनी पोलिस ठाण्यात कारवाई करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्ती विसर्जनानंतर पाग येथे राहाणारा सूरज कदम व मयूर मधुकर भोजने यांच्यात वाद झाला. यावेळी मयूर याने सूरज यांच्या फोनवर व्यक्तीगत भांडण असताना मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले.
यानंतर ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यामुळे अनेक समाजबांधव चिपळूण पोलिस ठाण्यात एकवटले आणि मयूर भोजने यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली.
अखेर पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करून मयूर भोजने याला ताब्यात घेऊन अटक केली व समाजात तेढ निर्माण होईल अशाप्रकारे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई करण्यात यावी म्हणून अनेक समाजबांधव पोलिस ठाण्यात धडकले. यामध्ये बाळा कदम, सतीश मोरे, कपिल शिर्के, सुधीर भोसले, अजय साळवी, पप्या साळवी, गौरव पाटेकर, योगेश शिर्के, परेश मोरे, संतोष सावंतदेसाई, राजेश साळवी, राजेश कदम, अभिनव भुरण व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या प्रकरणी संबंधित भोजने याने सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्याबाबत जाहीर माफीदेखील मागितली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 10/Sep/2025














