चिपळूण : चिपळूण तालुक्यातील पिंपळी पूल कोसळल्याने व पेढांबे पुलावर वाढत्या वाहनांच्या दाबामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दररोज वळसा मारून प्रवास करावा लागत असल्याने सामान्य जनता, कामगार, कर्मचारी व विद्यार्थी वर्गाला वेळ, पेट्रोल आणि खर्चाचा नागरिकांतर्फे राष्ट्रवादीचे फटका बसत आहे. यामुळे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी तातडीचा पिपा पूल पर्याय म्हणून उभारण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
त्यांनी निवेदनात नमूद केले की, कुंभमेळ्यात याच प्रकारचे पिपा पूल लाखो भाविकांनी सुरक्षितपणे वापरले आहेत. पिंपळी पुलाच्या ठिकाणी व पेढांबे पुलासाठी पर्याय म्हणून दोन पिपा पूल उभारल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. पेढांबे पूल जीर्ण झाल्याने त्याचे पुनर्निर्माण करणे अपरिहार्य आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी व जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 10/Sep/2025














