रत्नागिरी : देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शासकीय रुग्णालयातील पॅथॉलॉजी लॅबोरेटरीला क्षेत्रभेट

रत्नागिरी : देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष प्राणिशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील पॅथॉलॉजी लॅबोरेटरीला क्षेत्रभेट दिली. राकेश लिंगायत यांनी सीबीसी, रक्तगट, हिमोग्लोबीन तपासणी, केएफटी, एलएफटी, ब्लिडिंग क्लॉटिंग टाइम अशा चाचण्या करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. तसेच शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेत चालणाऱ्या कामांविषयी माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध शंकाचे निरसनही केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:06 PM 21/Oct/2024