रत्नागिरी : मिऱ्या कोल्हापूर-नागपूर या राष्ट्रीय महमार्गाच्या कामाला दोन वर्षे पूर्ण झाली तरी अजून काम अपूर्ण आहे. आता शासनाने पुन्हा मार्च २०२६ पर्यंत ठेकेदार कंपनीला मुदतवाढ दिली आहे. ८६८ कोटीचा सुमारे ५६ किमीचा हा रत्नागिरी ते आंबा असा टप्पा आहे; परंतु आता या कामामध्ये नव्याने ९२ कोटींची निविदा काढण्यात आली आहे. मूळ कामात आताची कामं का समाविष्ट करण्यात आली नाहीत? महामार्गाचे काम का रेंगाळले आहे, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
मिऱ्या-नागपूर महामार्गाचे गेल्या दोन वर्षांमध्ये ५६ किमीपैकी ४२ किमी डाव्या बाजूचे काँक्रिटीकरण झाले आहे तर ४४ किमी दोन्ही बाजूने काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. या टप्प्याची पूर्ण निविदा ९३० कोटींची होती; परंतु या मार्गावर वाहतूक नसल्यामुळे ती कमी करून ८६७ कोटी केली. दोन वर्षे झाली तरी ठेकेदार कंपनीकडून काम पूर्ण झालेले नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:32 PM 10/Sep/2025














