khed Taluka Mahavikas Aghadi : जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

खेड : केंद्रशासन व महाराष्ट्र शासन यांनी केलेला जनसुरक्षा विधेयक २०२४ हा कायदा रद्द करावा यासाठी बुधवार दिनांक १० सप्टेंबर रोजी खेड तालुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येऊन तीनबत्ती नाका खेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी या जनसुरक्षा विधेयक २०२४ या कायद्याला विरोध करत निषेध केला व तेथून तहसिलदार खेड यांना निवेदन सादर केले.

यावेळी महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष विनायक निकम, खेड तालुकाप्रमुख दत्ता भिलारे, खेड शहर काँग्रेस अध्यक्ष विजय जैन, रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष महेंद्र कदम, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुरज जोगळे, खेड शिवसेना शहर प्रमुख पाटणे ऊपतालुका प्रमुख बबलू सकपाळ, मंगेश भागवत, शिरीष पाटणे राष्ट्रवादी दापोली विधानसभेचे युवक अध्यक्ष मोहसिन मुल्ला, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सौ. गिता घाणेकर, सुनंदा निकम, रामचंद्र शिगवण, लक्ष्मण घोलप असे असंख्य महाविकास आघाडीमधील तालुक्यातील कार्यकर्ते व महिला महाविकास आघाडीच्या माध्यमातून उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 11/Sep/2025