Chiplun : दुचाकी घसरून जखमी झालेल्या स्वाराचा उपचारादरमान्य मृत्यू

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर बायपास मार्गाजवळ दुचाकी घसरून जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. प्रदीप नारायण लिबे (वय ४७, कामथेखुर्द-हरेकरवाडी) असे त्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिबे हे चिपळूण शहरातील हॉटेलमध्ये कामाला होते. १ सप्टेंबर रोजी दुपारी लिबे हे दुचाकी घेऊन कामथे-हरेकरवाडी येथे घरी जात होते. ते महामार्गावरील गुहागर बायपास मार्गाजवळ आले असता त्यांची दुचाकी घसरली आणि ते रस्त्यावर कोसळले. या अपघातात लिबे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच ४ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 11/Sep/2025