Rajapur : जवाहरचौक ते गणेशघाट येथे वाहतुकीस अडथळा करणाऱ्यांवर कारवाई

रत्नागिरी : जवाहरचौक ते गणेशघाट (ता. राजापूर) येथील सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस व रहदारीस अडथळा करणाऱ्या दोन वाहनचालकांविरुद्ध राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मकसुद इनायत सोलकर (वय ४४, रा. नाणार इंगळवाडी, राजापूर) व आनंद नामदेव कोळेकर (५५, खडपेवाडी, राजापूर) अशी संशयित चालकांची नावे आहेत. या घटना सोमवारी (ता. ८) सकाळी सव्वादहा ते साडेअकराच्या सुमारास जवाहरचौक ते गणेशघाट व जवाहरचौक पिकअप् शेड येथील सार्वजनिक रस्त्यावर निदर्शनास आल्या. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल नितीन फाळके यांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मालवाहतूक टेम्पो वाहतुकीस व रहदारीस अडथळा होईल, असा पार्क करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुचित सुनील जाधव (२५, रा. मठ मराठवाडी, ता. लांजा) असे संशयित चालकाचे नाव आहे. याप्रकरणी साहाय्यक पोलिस फौजदार साक्षी भुजबळराव यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 11/Sep/2025