ब्रेकिंग: CP Radhakrishnan: सी.पी. राधाकृष्णन देशाचे १५ वे उपराष्ट्रपती; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांना पदाची शपथ दिली.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार असलेल्या राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा १५२ मतांनी पराभव करून उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली. २१ जुलै रोजी जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर, ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीसाठी निवडणूक झाली होती.

महाराष्ट्र राज्यपाल पदाचा दिला राजीनामा
उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती भवनाने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी राधाकृष्णन यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. देवव्रत आता दोन्ही राज्यांच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळतील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 12-09-2025