सावर्डे : सावर्डे पंचक्रोशीतील रहदारीने गजबजलेला रस्ता म्हणजे डेरवण फाटा ते वालावलकर रुग्णालय; मात्र या रस्त्यावर स्वप्नल निवासी संकुल क्र. ३ च्या समोर वळणावरच अंदाजे एक फूट उंचीचा खड्डा पडला आहे. या ठिकाणी अपघाताचा धोका आहे.
या रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसह खासगी वाहनांची अखंड वर्दळ असते. वालावलकर रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, इंग्रजी माध्यमाची शाळा तसेच डेरवण, हडकणी या मार्गावर सतत ये-जा असते. सध्या या रस्त्यावर कुडप फाटा, डेरवण फाटा व वालावलकर रुग्णालय या ठिकाणी एवढे खड्डे पडले आहेत की, वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागते. स्वप्नल निवासी संकुल क्र. ३ च्या समोरील वळणावरच अंदाजे एक फूट उंचीचा खड्डा पडला आहे. भरीस भर म्हणून की काय या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचून हा खड्डा पाण्याखाली जातो. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. तिथेच रस्त्याला वळण असल्याने नवखा वाहनचालक या खड्ड्यात फसतो. सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 21/Oct/2024









