राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस प्रवासात ५० टक्के सवलत मिळवण्यासाठी एसटी महामंडळाचे विशेष ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले. एसटी महामंडळाचे विशेष ओळखपत्र नसेल, तर एसटी बस प्रवासात सवलतीचा लाभ घेणं शक्य होणार नाही.
त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे ओळखपत्र लवकर तयार करून घेणे आवश्यक आहे.
मार्च २०२३ पासून महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सर्व प्रकारच्या एसटी बस सेवांमध्ये ५० टक्के सवलत जाहीर केली होती. या निर्णयाचा लाभ अनेक महिला घेत आहेत आणि तो ऑर्डिनरी, मिनी, निमआराम, शिवशाही, आणि शिवशाही स्लीपर सर्व प्रकारच्या बस सेवांमध्ये लागू आहे.
नवीन नियम
याआधी महिला आणि ज्येष्ठ नागरिक तिकिट सवलत मिळवण्यासाठी आधार कार्ड दाखवत होते. मात्र, एसटी महामंडळाने हा नियम बदलला आहे. आता महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळवण्यासाठी एसटी परिवहन विभागाचे अधिकृत ओळखपत्र दाखविणे बंधनकारक असेल.
ओळखपत्र अनिवार्य
एसटी महामंडळाद्वारे दिले जाणारे हे विशेष ओळखपत्र महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना लवकरात लवकर बनवून घेणे अनिवार्य आहे. या ओळखपत्राशिवाय, त्या प्रवाशाला ५० टक्के सवलत मिळणार नाही, आणि त्याला पूर्ण तिकिट भाडे भरावे लागेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:04 12-09-2025














